Bigg Boss Marathi5: आर्याला घराबाहेर काढणं बिग बॉसला पडणार भारी! आर्याने केलेल्या "त्या" कृत्याला प्रेक्षकांचा फूल सपोर्ट
बिग बॉसचे आता 6 ते 7 आठवडे होऊन गेले आहेत त्यामध्ये अनेक अंचबित करणाऱ्या घटना घडून गेल्या आहेत. ज्यामध्ये पॅडीचा अपमान केल्यामुळे जान्हवीला जेलमध्ये ठेवण्यात आलं होत. त्यानंतर ती बाहेर ही आली आणि लगेच घनश्यामला घराबाहेर काढण्यात आले. घनश्याम घराबाहेर गेल्यानंतर प्रेक्षकांना वाईल्ड कार्ड स्पर्धकाची उत्सुकता लागली होती कारण, घनश्याम गेल्यानंतर बाहरून वाईल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री बिग बॉसच्या घरात होणार होती आणि ही एन्ट्री केली संग्रामने. ज्यावेळेस संग्राम बिग बॉसच्या घरात प्रवेश करून आला त्यावेळेस प्रेक्षकांना वाटलं होतं की, आता काही तरी नवा गेम पाहायला मिळेल. मात्र तसं काही न होता पुन्हा तोच खेळ चालू झाला.
अशातच एलिमिनेशन गेमच्या दरम्यान आर्या आणि निक्कीमध्ये बाचाबाची झाली. ज्यामध्ये आधी त्यांच्यात धक्काबुक्की झाली आणि थोड्यावेळाने या धक्काबुक्कीचे रुपांतर हातापायीत झालं. यामध्ये आर्याने निक्कीच्या कानशीलात मारल्याचा प्रकार समोर आला. आर्याने धक्काबुक्की करतं असतानाच निक्कीच्या कानाखाली मारली आणि आर्याची ती कृती बिग बॉसच्या नियमांच्या विरोधात असल्यामुळे आर्याला एलिमिनेट करण्यात आलं आणि घरातून बेदखल करण्यात आलं. ज्यामुळे प्रेक्षकांकडून संताप व्यक्त करताना पाहायला मिळाला.
मात्र दुसरीकडे निक्कीची आई प्रमिला तांबोळी देखील बिग बॉसकडे आर्या आणि इतर स्पर्धकांची तक्रार करताना समोर आल्या ज्यात घरातले सर्व स्पर्धक एकत्र मिळून निक्कीला मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत असं त्या म्हणाल्या. तर तक्रार करतं असताना प्रमिला तांबोळी म्हणाल्या, कोणाला आवडेल त्यांचं एकुलतं मूल रोज शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करताना पाहणं? खेळ नियमांनुसार आणि सन्मानाने खेळला पाहिजे. एका आईचं दुःख समजून घ्या, जी आपल्या मुलीला असं राष्ट्रीय टीव्हीवर छळ सहन करताना पाहत आहे. राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर, गैरवर्तन इतके गंभीर होते की ते व्हिज्युअल देखील दाखवू शकत नव्हते. आणि जे त्याचे समर्थन करतात आणि समर्थन करतात त्यांना - लाज वाटते! नियम आणि सीमा यांचा आदर राखून खेळ निष्पक्षपणे खेळला गेला पाहिजे. आता आपल्या मुलाला टीव्हीवर अशा कृती सहन करताना पाहणाऱ्या पालकांच्या वेदनांची कल्पना करा. आमच्या मराठी मुळगीने खूप काही सहन केले आहे आणि ती नेहमीच खंबीर राहिली आहे. पण यावेळी ती तुटल्याने गंभीर आहे. तरीही, आम्हाला माहित आहे की ती एक फिनिक्स आहे आणि ती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल.
तर आर्याला घरातून बेदखल केल्यामुळे प्रेक्षक आणि नेटकर्यांनी कमेंटद्वारे आपले मत मांडले ज्यात ते म्हणाले, "आर्याने जे केलं ते 100% बरोबर च केलं, कोणीतरी निक्की च थोबाड फोडण गरजेचं होत". "अख्खा महाराष्ट्र आर्या सोबत आहे". तसेच एकाने थेट रितेश देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे ज्यात एक नेटकरी म्हणाले, "जर वोटिंगला काही महत्त्व नसेल , टीआरपीसाठी कमी वोट मिळाले असून पण माणसांना घरात ठेवत असाल तर उगचं प्रत्येक शनिवार, रविवार येऊन हे बोलू नका की महाराष्ट्र बघत आहे जनता च ठरवेल कोणाला घरात ठेवायचं आणि बाहेर कोणाला काढायचा. तसं असतं तर सर्वाधिक तिरस्कार करणाऱ्या निक्की, वैभव, अरबाज, जान्हवी कधीच बाहेर पडले असते. उगीच जनता , महाराष्ट्र करत बसू नका". तर पुढे म्हाणाले, "बंद करा शो बागायच निकी चा बिग बॉस चालू आहे". "आर्य ने बरोबर केलय.." "अजून 2 वाजवायला पाहिजे होत्या निकीच्या कानाखाली". "आर्याला आमचा पाठिंबा आहे". "आर्याला जर बाहेर काढलं बिग बॉस नंतर आम्ही बिग बॉस पाहणार नाही बिग बॉस ने ही गोष्ट ध्यानात ठेवावी".